Ladki bahin yojana Update2026:राज्यातील माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.या योजनेसाठी महाराष्ट्रातील लाखो महिलांनी अर्ज भरले आणि सरकारकडून महिन्याला ₹1500 रुपये मिळत होते.यानंतर सरकारने KYC करण्यास सांगितले, पण KYC करूनही पैसे आले नाहीत.लाखो महिलांचे पैसे अडकलेले आहेत कारण काही महिलांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला आहे किंवा e-KYC प्रक्रिया योग्यरीत्या पूर्ण झाली नाही.अशा महिलांसाठी शासनाकडून आवश्यक पावले उचलण्यात आले आहेत.
Physical Verification सुरू होणार:सरकारने आता Physical Verification (प्रत्यक्ष पडताळणी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Physical Verification बाबत सूचना:e-KYC प्रक्रियेत अडचण आलेल्या किंवा चुकीची नोंद झालेल्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्यात येणार आहे.ही पडताळणी क्षेत्रीय स्तरावर आंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे.याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने सूचना दिल्या आहेत.
लक्षात ठेवा:
ही physical verification सर्वांसाठी नाही.
फक्त ज्यांची e-KYC मधील डिजिटल पडताळणी technical डाटा चुकीमुळे पूर्ण झाली नाही, त्यांच्यासाठीच आहे.e-KYC पूर्ण झाली असेल तर Physical verification आवश्यकता नाही.e-KYC Status कसा Check करायचा?मोबाईल/लॅपटॉपवर अधिकृत वेबसाइट उघडून e-KYC status check करा:
Link - ladakibahin.maharashtra.gov.in
eKYC नंतर पैसे का नाही आले माहीती- https://www.yojanamitr.online/2026/01/ladki-bahin-yojana-kyc.html
Physical Verification वेळी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड.
बँक पासबुक (खाते आधार लिंक असलेले).
राशन कार्ड.
उत्पन्न प्रमाणपत्र (असल्यास).
मोबाईल नंबर (OTP साठी).
विधवासांठी पतीचा म्रुत्यु दाखला.
Physical Verification नंतरची Process:माहिती बरोबर असल्यास, तुमचं e-KYC manually approve केलं जातं.पुढील DBT सायकलमध्ये ₹1500 थेट खात्यात जमा होतात.पैसे किती दिवसात येतील?15 ते 30 दिवस (जिल्ह्यानुसार फरक)
Verification नंतरही पैसे आले नाहीत तर काय करायचं?
1️⃣ पुन्हा वेबसाइटवर Status Check करा
2️⃣ e-KYC = Verified आहे का पाहा
3️⃣ बँकेत जाऊन आधार-लिंक खाते तपासा
4️⃣ ग्रामसेवक / आंगणवाडी सेविकेला संपर्क करा
5️⃣ तक्रार नोंदणी (Grievance) करा
---------------थोडक्यात संदेश:----------------------
जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमच्या खात्यात पैसे येत नसतील, तर तुमची e-KYC स्थिती तपासणे खूप महत्वाचे आहे.जर e-KYC मध्ये त्रुटी असेल, तर Physical Verification द्वारे ही समस्या दूर होऊ शकते आणि पुढील DBT सायकलमध्ये ₹1500 थेट खात्यात जमा होईल.यामुळे महिलांनी आवश्यक कागदपत्रे (आधार, बँक पासबुक, राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र इ.) तयारीने ठेवावीत आणि योग्यरित्या पडताळणी करून घ्यावी.जर फिरही समस्या सुटत नसेल, तर वेबसाइटवर Status Check करणे, आधार-बँक लिंक तपासणे आणि आवश्यक तक्रार नोंदणी करणे हे पावले घ्यावीत.अंततः, शासनाची Physical Verification प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित आहे, त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून न जाता योग्य मार्गदर्शनानुसार तपासणी करून घ्यावी.
लाडकी बहीण योजना 2026: पैसे आले नाही? आता Physical Verification सुरू!
0 Comments