आई कर्ज योजना 2026 Update: महिलांना मिळणार 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज.
राज्य सरकारने महिलांना उद्योगांमध्ये पाठबळ मिळण्या साठी आई कर्ज योजना ही नवीन योजना अमलात आणली आहे या योजने अंतर्गत महिलेला 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे या योजने अंतर्गत पर्यटन संदर्भात 41 प्रकारच्या व्यवसायांना 15 लाख रुपयांचे पाठबळ मिळणार आहे कर्जाच्या स्वरूपात
तसेच , जर कर्जदार महिला कर्जाच्या हप्त्या वेळेवर भरत असेल , तर तिला त्या कर्जावरील १२ टक्के पर्यंतचे व्याज परत मिळणार आहे
या कर्जाच्या मदतीने महिला आपला छोटासा असणारा व्यवसाय मोठ्या स्तरावर नेऊ शकतात तसेच त्यांच्यामध्ये व्यवसाय करण्याची हिम्मत ही वाढते
*योजनेचे फायदे*
1.महिलांना बिनव्याजी कर्ज मिळते 2.महिला सक्षमीकरण होते
3.महिलांचा व्यवसाय छोट्या स्तरावरून मोठ्या स्तरावर जाण्यास मदत होते
4.महिलांचा आत्मविश्वास वाढतो 5.महिलांना खेळते भांडवल मिळते.
*कोणते व्यवसाय करू शकतो*
होमस्टे (Homestay): पर्यटकांना राहण्यासाठी घरगुती सोय उपलब्ध करून देणे.
ट्रॅव्हल एजन्सी: टुरिस्ट टॅक्सी किंवा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय.
गाईड सर्व्हिस: पर्यटन स्थळांची माहिती देणारे मार्गदर्शक.
हस्तकला विक्री: स्थानिक वस्तू किंवा खाऊचे स्टॉल्स.
हॉटेल किंवा खानावळ: पर्यटकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देणे
*आवश्यक कागदपत्रे*
1.अर्जदार महिलेचा आधार कार्ड 2.ओळखपत्र / वीजबील
3.पॅन कार्ड
4.रहिवासी प्रमाणपत्र
5.उत्पनाचा दाखला
6.जात प्रमाणपत्र(sc st)
7.व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र
8.नोंदणी प्रमाणपत्र मालकी हक्काचा दर्शविणारे स्टॅम्प पेपरवर रीतसर नोटरी केलेला अर्ज
9.अन्न व औषध प्रशासन परवाना(हाँटेल संदर्भात व्यवसाय असेल तर)
10.जीसटी क्रमांक( असेल तर)
11.रद्द केलेला चेक
12.व्यवसाय प्रकल्प
13.आवश्यकशासकीय परवाने
*योजने साठी पात्रता*
1.पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व महिलांनीच चालवलेला असावा .
2.पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे .
3.पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या प्राप्त असाव्यात .
4.कर्जाचे सर्व हप्ते वेळेत भरणे बंधनकारक आहे .
5.लाभार्थी , पर्यटन व्यवसाय आणि कर्ज देणारी बँक हे तिन्ही महाराष्ट्र राज्यात स्थित असणे आवश्यक आहे .
. अर्ज कसा करावा? (How to Apply)
आई कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे प्रक्रिया करू शकता:
पहिली पायरी: सर्वात आधी आपल्या व्यवसायाची नोंदणी MTDC च्या अधिकृत पोर्टलवर करा.
दुसरी पायरी: एखाद्या राष्ट्रीयीकृत किंवा मान्यताप्राप्त बँकेतून व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून घ्या.
तिसरी पायरी: कर्ज मंजूर झाल्यानंतर, व्याजाच्या परताव्यासाठी पर्यटन विभागाच्या कार्यालयात किंवा त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करा.
अशाच सरकारी योजनांची माहीती मिळवण्यासाठी फोलो करा.
निष्कर्ष
'आई' कर्ज योजना ही महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. जर तुमच्याकडे पर्यटनाची आवड असेल आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, तर या योजनेचा नक्कीच विचार करा.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुमच्या गरजू मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.
0 Comments