मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजना २०२६
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
हे ही वाचा :
महाराष्ट्र दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळल्यामुळे बाहेर राहून उच्च शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि निवासाच्या खर्चासाठी 'वार्षिक निर्वाह भत्ता' दिला जातो.
मिळणारी आर्थिक मदत (वार्षिक)
| अभ्यासक्रमाचा प्रकार | वार्षिक भत्ता रक्कम |
|---|---|
| पदविका किंवा २ वर्षांपेक्षा कमी अभ्यासक्रम | ₹ ५,०००/- |
| २ ते ३ वर्षांचे पदवी अभ्यासक्रम | ₹ ५,०००/- |
| ४ ते ५ वर्षांचे व्यावसायिक अभ्यासक्रम (उदा. इंजिनिअरिंग, मेडिकल) | ₹ ७,०००/- |
हे ही वाचा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2026: विद्यार्थ्यांसाठी ₹51,000 पर्यंत अर्थसाहाय्य!
✅ योजनेसाठी आवश्यक पात्रता:
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थ्याचे पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे.
- विद्यार्थ्याने शासनमान्य महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
📄 आवश्यक कागदपत्रे:
• जातीचा दाखला (Caste Certificate)
• उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
• डोमिसाईल प्रमाणपत्र
• आधार कार्ड
• बँक पासबुक छायाप्रत
• कॉलेज फी पावती
हे ही वाचा :
महाडीबीटी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2026 | नवीन विहीर अनुदान संपूर्ण मार्गदर्शिका
🖥️ अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी MahaDBT पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

0 Comments