Mahabocw नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती २०२६: सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या  पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती २०२६

योजनेचा लाभ, पात्रता आणि अर्जाची संपूर्ण मार्गदर्शिका

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (Mahabocw) मार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी एकूण २८ हून अधिक योजना राबवल्या जातात. यातील सर्वात महत्त्वाची आणि फायदेशीर योजना म्हणजे 'शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना'. आर्थिक परिस्थितीमुळे कामगारांच्या हुशार मुलांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने इयत्ता पहिलीपासून ते उच्च वैद्यकीय शिक्षणापर्यंत सरकारकडून भरघोस आर्थिक मदत दिली जाते.

आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या योजनेचे स्वरूप, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तर जाणून घेणार आहोत

१. शिष्यवृत्तीची रक्कम (फायदे)

शिक्षण / कोर्स मिळणारी रक्कम (दरवर्षी)
पहिली ते सातवी₹ २,५००/-
आठवी ते दहावी₹ ५,०००/-
अकरावी व बारावी₹ १०,०००/-
पदवी शिक्षण (BA, BCom, BSc)₹ २०,०००/-
पदविका (Diploma / ITI)₹ २०,०००/-
अभियांत्रिकी (BE / B.Tech)₹ ६०,०००/-
वैद्यकीय शिक्षण (MBBS)₹ १,००,०००/-
💡 विशेष टीप: जर पाल्य १० वी किंवा १२ वी परीक्षेत ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाला, तर त्याला अतिरिक्त रोख पारितोषिक दिले जाते.

२. पात्रतेचे निकष.

  • कामगाराचे नोंदणी कार्ड चालू (Active/Live) असावे.
  • १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान ७५% असावी.
  • हा लाभ कामगाराच्या पहिल्या दोन अपत्यांनाच मिळतो.
  • विद्यार्थी शासनमान्य शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असावा.

३. आवश्यक कागदपत्रांची यादी

BOCW कामगार ओळखपत्र
आधार कार्ड (पालक व पाल्य)
पाल्याचा सरल ID 
मागील वर्षात ७५% हजार असलेला दाखला 
बोनाफाईड दाखला (चालू वर्ष)
मागील वर्षाचा निकाल
बँक पासबुक झेरॉक्स
रेशन कार्ड प्रत
स्व-घोषणापत्र

फॉर्म भरण्यासाठी किंवा अधिक मदतीसाठी:

आपले सरकार सेवा केंद्र - वाघळवाडी
रेणुकानगर, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे.
  अधिक माहितीसाठी call करा 9021271669
📲 WhatsApp ग्रुप जॉईन करा

(सर्व सरकारी योजनांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा)

0 Comments