Ticker

6/recent/ticker-posts

Ladki bahin yojana 2026-e kyc पुन्हा सुरु! KYC नंतर पैसे येणारच !



Bahin Yojana 2026 E-KYC Update: e-KYC करा आणि ₹1500 हप्ता मिळवा !

लाडकी बहीण योजना ही योजना सरकारने राज्यातील दुर्बल व ज्यांची आर्थिक परीस्थिती नाजुक आहे अशा महिलांना सरकार कडुन ही योजना सुरु केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बलमहिलांना नियमित आर्थिक मदत देऊन त्यांची मदत करुण त्याची आर्थिक परीस्थिती  सुधारण्याचा हा उपक्रम आहे.महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अतिशय महत्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे. या योजनेअंतर्गत  दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात (DBT) जमा केले जातात. या योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने काही पात्रता निकष ठरवले आहेत जे आपण खाली बघु.

1 ) महीलेचे वय हे २१ ते ६५ वर्ष आवश्यक आहे.

2 ) महीला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.

3 ) महीलेचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.

4 ) एका कुटुंबातील फक्त एकालाच लाभ भेटेल.

5 ) जवळपास च्या बँक मधे खात असावे आधार लिंक असावे

  Link - ladakibahin.maharashtra.gov.in

मित्रांनो  हे सगळे निकष पूर्ण करूनही काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही यामागे काही कारणेही असू शकतात जसे की कुटुंबातील जर कोणी टॅक्स भरत असेल पती किंवा वडील सरकारी नोकरीला असतील तसेच घरात कोणाकडे चार चाकी वाहन असेल तरीही या योजनेचा लाभ मिळत नाही तसेच जर महिन्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.

69 लाख महिलांचे e-KYC चुकीचे/प्रलंबित

त्यामुळे अनेकांचे पैसे अडकले आहेत

सर्वात महत्त्वाचे कारण-- ही E KYC चुकीची झाली /किंवा झालीच नाही.

मित्रांनो नवीन सरकारच्या नियमानुसार ज्यांचं एक KYC चुकीची झाली होती किंवा काही चुकीची माहिती भरली गेली असेल अशा बहिणींसाठी आता नवीन संधी सरकारने दिली आहे म्हणजेच आता पुन्हा Ladki bahin yojana EKYC सुरू झाली आहे आणि ज्यांची ई केवायसी झालीच नव्हती अशा बहिणींनाही आता नव्याने ही केवायसी करता येणार आहे जर तुम्ही स्वतः ये EKYC मोबाईल वरून केली असेल व ती ई केवायसी चुकली असेल किंवा चुकीची माहिती भरली असेल तर अशा बहिणींसाठी Physical verification ही सुरू झाले आहे आता एक E-KYC सुरू झाली आहे तर तुम्ही ते जवळच्या अंगणवाडी हे सेविका किंवा जवळील CSC सेंटर यांच्या मदतीने ही केवायसी पुन्हा करून घ्यावी जेणेकरून एक केवायसी मध्ये काहीही चूक होणार नाही व तुमचे पैसे अडकणार नाहीत ही EKYC साठी काही आवश्यक डॉक्युमेंट लागतात ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ते documents काय आहेत हे आपण खाली पाहुया.

 e KYC साठी आवश्यक कागदपत्र -

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

बँक पासबुक

उत्पन्न प्रमाणपत्र

मतदान कार्ड / रेशन कार्ड

फोटो

e KYC कशी करायची -

Online (मोबाईल / लॅपटॉप)

अधिकृत वेबसाइट ओपन करा

ladkibahin.maharashtra.gov.in

 “E-KYC / Beneficiary Login” वर क्लिक करा

Aadhaar Number टाका

मोबाईलवर आलेला OTP टाका

वैवाहिक स्थितीनुसार पर्याय निवडा

अविवाहित महिलांनी वडिलांचा Aadhaar + OTP टाका

विवाहित महिलांनी पतीचा Aadhaar + OTP

सर्व माहिती Verify करा

 Submit करा – E-KYC Complete!

लक्षात ठेवा:

ही physical verification सर्वांसाठी नाही.

फक्त ज्यांची e-KYC मधील डिजिटल पडताळणी technical डाटा चुकीमुळे पूर्ण झाली नाही, त्यांच्यासाठीच आहे.e-KYC पूर्ण झाली असेल तर Physical verification आवश्यकता नाही.e-KYC Status कसा Check करायचा?मोबाईल/लॅपटॉपवर अधिकृत वेबसाइट उघडून e-KYC status check करा:

लाडकि बहिण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थितीत दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी एक वरदान आहे कृपया जर काही तांत्रिक अडचण असेल किंवा फॉर्म भरण्यामध्ये किंवा केवायसी करण्यामध्ये काही समस्या येत असेल तर आपण कोणाची तरी मदत नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या हक्काचे 1500 रुपये दरमहा भेटतील जर फॉर्म भरण्यात किंवा केवायसी करण्यात तुम्हाला आमची मदत हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला निशुल्क E kyc  करून देऊ धन्यवाद ! 


Yojana Mitra Logo

Post a Comment

0 Comments