Ticker

6/recent/ticker-posts

Donkey Farming 2026 : गाढव पालनासाठी 50 Lakh कर्ज: केंद्र सरकारची 50 Lakh subcidy

गाढव पालनासाठी सरकार देणार 50 लाख!

भारत सरकार कृषी क्षेत्रात शेतीसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबवत असते त्यामध्येच भारतातील शेती करणारे शेतकरी हे मोबिलक प्रमाणात पशुपालन देखील करत असतात आता अशाच पशुपालन शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य माणसासाठी केंद्र सरकारने गाढव पालन याकरिता एक योजना बनवली आहे या योजनेअंतर्गत पशुपालकाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे केंद्र सरकारने ही योजना आणली आहे.

एकूणच, गाढवांची घटती संख्या ही फक्त प्राण्यांची समस्या नसून ग्रामीण परंपरा, रोजगार आणि जैवविविधतेशी संबंधित मुद्दा आहे. योग्य वेळी उपाययोजना केल्यास ही परिस्थिती सुधारता येऊ शकते.२०१२ पासून आतापर्यंत गाढवांच्या संख्येत सुमारे ६०% घट झाली आहे. २०१९ च्या पशुगणनेनुसार भारतात आता फक्त १.२३ लाख गाढवे शिल्लक आहेत. ही घट चिंताजनक मानली जात आहे. कारण गाढव हे अनेक गरीब व पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांसाठी उपजीविकेचे साधन होते.

योजना कोणती आहे?

सरकार देशातील गाढव, घोडे आणि उंट यांच्या स्वदेशी जातींचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन मिशन (NLM) अंतर्गत विशेष योजना राबवत आहे. ही योजना २०१४–१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश पशुधनाच्या स्थानिक जातींचे संवर्धन करणे, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि पशुपालनाला चालना देणे हा आहे. यामध्ये गाढव, घोडे आणि उंट पाळणाऱ्या शेतकरी व पशुपालकांना अनुदान आणि आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचे उद्दिष्ट असे आहे की लोकांनी या प्राण्यांचे संगोपन करावे, त्यांच्या जाती टिकून राहाव्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन आधार मिळावा.

NLM योजनेचे फायदे ;

राष्ट्रीय पशुधन मिशन (NLM) ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. या योजनेचे प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत:

५०% subsidy - 

या योजनेत पशुपालन प्रकल्पासाठी सरकारकडून एकूण खर्चाच्या ५०% पर्यंत अनुदान दिले जाते.

मोठ्या प्रकल्पांना मदत -

जर प्रकल्पाचा खर्च १ कोटी रुपये असेल, तर सरकारकडून ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.

 पशुंच्या  जातींचे संरक्षण -

गाढव, घोडा, उंट यांसारख्या स्वदेशी जातींचे संवर्धन करण्यासाठी सरकार विशेष मदत देते.

रोजगार  निर्माण -

या योजनेमुळे ग्रामीण भागात नवीन व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

 प्रजनन केंद्र उभारण्यासाठी मदत -

राज्य सरकार किंवा संस्थांना नवीन प्रजनन फार्म किंवा वीर्य स्टेशन उभारण्यासाठी १० कोटी रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.

पशुपालन व्यवसायाला चालना -

या योजनेमुळे पशुपालन क्षेत्राचा विकास होतो आणि शेतकऱ्यांचे अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात.

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते

पशुपालनामुळे शेतीसोबतच स्थिर उत्पन्न मिळण्याची संधी मिळते.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?
जर तुम्ही राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेंतर्गत अर्ज करून 50 लाख रुपयांपर्यंतची अनुदान मिळवू इच्छित असाल, तर या योजनेच्या अधिकृत वेबसाइट nlm.udyamimitra.in वरुन अर्ज करू शकता. त्यानंतर बँककडून कर्ज घेऊन प्रोजेक्ट सुरू करू शकता आणि अनुदान थेट तुमच्या Bank account येईल. योग्य योजना आणि unit आकार निवडल्यास 50 लाख रुपयांची मदत सहज मिळवता येऊ शकते.



Post a Comment

0 Comments